'त्या' DRDO शास्त्रज्ञाचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न

याप्रकरणी पुढील तपास सुरु असताना डीआरडीओच्या शास्त्रज्ञाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
delhi
delhiesakal
Summary

याप्रकरणी पुढील तपास सुरु असताना डीआरडीओच्या या शास्त्रज्ञाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली - ९ डिसेंबर रोजी रोहिणी न्यायालयात स्फोट झाला होता. ((Rohini Court Bomb Blast) याचे धागेदोरे आता बाहेर येत आहेत. या घटनेने काहीकाळ न्यायालय परिसरात खळबळ निर्माण झाली होती. घटनेत एक न्यायालयीन (Court) कर्मचारी किरकोळ जखमीही झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी (Police action) एकाला अटक केली असून तो डीआरडीओचा शास्त्रज्ञ असल्याचं समोर आलं होत. दरम्यान आता या डीआरडीओ (DRDO) तील आरोपी शास्त्रज्ञानं तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

delhi
कर्नाटकचं राजभवन गाठा अन् बोम्मई सरकार पाडा; सेनेचं भाजपला आव्हान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी असलेल्या डीआरडीओच्या (DRDO Scientist) शास्त्रज्ञाने वकिलाला मारण्यासाठी स्फोट केल्याची धक्कादायक माहिती दिली होती. त्याचा आधीच वकिलासोबत वाद झाला होता. त्यामुळे वकिलाला (Advocate) मारण्यासाठी आरोपीने स्वतः आयईडी बॉम्ब तयार केला होता. याप्रकरणी पुढील तपास सुरु असताना डीआरडीओच्या या शास्त्रज्ञाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, ९ डिसेंबर रोजी रोहिणी न्यायालयाच्या रुमनंबर 102 मध्ये सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला होता. त्यानंतर न्यायालयात खळबळ माजली होती. तसेच या स्फोटामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि काही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार त्यांनी आरोपीला अटक केली होती.

delhi
ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन; ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com