जहांगीरपूर हिंसाचार : मुख्य आरोपी अन्सारसह 5 आरोपींना 8 दिवसांची पोलिस कोठडी

Delhi Police
Delhi Policeesakal
Summary

अन्य चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी (Jahangirpuri Voilence Case) सुनावणी करताना रोहिणी कोर्टानं (Rohini Court) सोनू, सलीम, दिलशाद आणि अहिर यांच्यासह मुख्य आरोपी आणि NSA अटकेत असलेला अन्सार यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय. त्याचबरोबर अन्य चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आज एकूण 9 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

हनुमान जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला होता. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. या सर्व आरोपींवर गृह मंत्रालयानं आधीच एनएसए लावलंय. शनिवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हिंसाचाराचे आरोपी सलीम चिकना, इमाम शेख उर्फ ​​सोनू चिकना, दिलशाद आणि अहिर यांच्यासह 9 आरोपींची रोहिणी कोर्टात हजेरी लावली.

Delhi Police
शरद पवारांबरोबर मतभेद, मात्र ते जातीयवादी नाहीत : राजू शेट्टी

रोहिणी न्यायालयात गुन्हे शाखेनं न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळं अधिक चौकशी करणे बाकी आहे, जेणेकरून कटात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेता येईल. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना पश्चिम बंगालसह अन्य ठिकाणी जावं लागेल, त्यामुळं चौकशीसाठी वेळ द्यावा, असं गुन्हे शाखेच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं. पोलिसांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं एनएसए अंतर्गत अटक केलेल्या अन्सार, सलीम चिकना, इमाम शेख उर्फ ​​सोनू चिकना, दिलशाद आणि अहिर या पाच आरोपींना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com