दिल्लीच्या निवडणुकीत 'या' मुद्द्यांमुळे 'आप' सगळ्यांवर भारी!

वृत्तसंस्था
Tuesday, 14 January 2020

विरोधकांकडे चेहराच नाही

- आंदोलन पॉलिटिक्स बंद 

- पक्षांतर्गत राजकारणाला पूर्णविराम

Delhi Election 2020 : नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिंगणात सत्ताधारी आम आदमी पक्षासह भाजप आणि काँग्रेस रिंगणात आहेत. पण, एक्झिट पोलचा अंदाज आणि स्थानिक पातळीवरचं वातावरण पाहिलं तर, पुन्हा आम आदमी पक्षालाच कौल मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीकर आपला पुन्हा संधी देण्याची शक्यता असून, अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. या एकतर्फी वातावरणा मागं काही प्रमुख कारणं आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम आदमी पक्षाच्या जामेच्या बाजू

विरोधकांकडे चेहराच नाही 
आंदोलन पॉलिटिक्स बंद 
वादाच्या विषयांपासून केजरीवाल लांब 
सरकारचे लोकप्रिय निर्णय
पक्षांतर्गत मतभेद मिटले 

Image result for aam aadmi party

विरोधकांकडे चेहराच नाही

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हा चेहरा असताना, भाजप आणि काँग्रेसकडे चेहरा नाही. भाजप मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरली आहे. त्यांच्याकडं डॉ. हर्षवर्धन आणि विजय गोयल हे प्रमुख नेते आहेत. पण, आपकडं असणारं एकतर्फी वातावरण आपल्याकडं खेचण्या एवढी त्यांची ताकद नाही. काँग्रेस सर्वाधिक गोंधळलेली नाही. त्यांच्याकडे सक्षम चेहरा नाही. अलका लांबा यांनी आपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी, त्या सत्तांतर करू शकतील, एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत. 

...म्हणून गंगारामला प्रथम फासावर लटकावतात

आंदोलन पॉलिटिक्स बंद 

अण्णा हजारेंच्या आंदोलनातून पुढं आलेल्या आम आदमी पार्टीनं गेल्या पाच वर्षांत आपल्या कामात खूप बदल केले आहेत. सत्तेवर आल्यानंतरही केजरीवाल या ना त्या निमित्तानं केंद्र सरकार, नायब राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलनाला बसत होते. पण, यामुळं होणारी निगेटिव्ह चर्चा टाळण्यासाठी केजरीवाल यांनी आपल्या शैलीत बदल केला. त्यांनी आंदोलन पॉलिटिक्स बंद, करून टाकलं आणि स्थानिक मुद्द्यांवर भर देण्यास सुरुवात केली. 

वादग्रस्त मुद्द्यांपासून केजरीवाल

दिल्लीत अनेक वादाचे राष्ट्रीय मुद्दे उफाळून आले असताना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला त्यापासून दूर ठेवलंय. सीएए, एनआरसी, यासारख्यांविषयांवर त्यांनी फारशी आक्रमक प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच दिल्लीतील जामियाँ-मिलियाँ आणि जेएनयू विद्यापीठांमध्ये आंदोलन आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्या तरी, त्याविषयांपासून केजरीवाल दूर राहिले आहेत. 

पक्षांतर्गत राजकारणाला पूर्णविराम

आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षात मतभेद उफाळून आले होते. कुमार विश्वास यांच्यासह अनेकांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यासगळ्या प्रकाराला गेल्या दोन वर्षांत पूर्णविराम मिळालाय. पक्षाचं काम, सरकारचं काम सुरळीत सुरू आहे. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे दोन्ही दोन नेते सध्या चर्चेत आहेत. इतर नेते मात्र प्रकाशझोतात नाहीत. पण, तरीही दिल्लीत आपचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. 

लोकप्रिय निर्णय

महिलांना दिल्लीत मोफत प्रवास, प्रवास असेल किंवा मोफत पाणी, वीज असेल, केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये झालेली सुधारणा लक्षवेधी ठरली आहे. देशातील इतर राज्यांमधील नेत्यांनीही त्याची दखल घेतली असून, दिल्लीतील सरकारी शाळांना भेट दिली आहे. तसेच मोहल्ला क्लिनिक या आरोग्य क्षेत्रातील कामाचीही देशातच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Role of Aam Aadmi Party in Delhi Politics