गोव्यातील राज्यपालांची भूमिका घटनाबाह्य : चोडणकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पणजी (गोवा) : सभापती हे पद तटस्थ असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ध्वजारोहण सभापतींनी करणे हे घटनेनुसार नाही. सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांबाबतचे मुख्यमंत्र्यांचे विचार त्यांना मांडण्याचा अधिकार नसताना राज्यपालांनी त्यात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे त्या भाजपच्या कार्यालय अधिकाऱ्याप्रमाणे वागत आहेत, असा आरोप गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. त्यांना पदाबाबत नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. अथवा राष्ट्रपतींनी त्यांच्या घटनाबाह्य वागणुकीमुळे गोव्यातून परत बोलावावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

भारत स्वातंत्र्यदिनवेळी सभापतींनी ध्वजारोहण केल्यानंतर पुन्हा एकदा गोवा मुक्तिदिनी सभापतींनी ध्वजारोहण करून ते तटस्थ नसल्याचे दाखवून दिले आहे. घटनेचे संरक्षण करणाऱ्या राज्यपालांनीही यामध्ये हस्तक्षेप केला नाही. यावरून राज्यातील प्रशासन कोलमोडले असून, घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ध्वजारोहण करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याकडे देण्याची गरज होती. मात्र, तसे न करता राज्यात सत्ताधारी व विरोधक यांच्यात तटस्थ भूमिका बजावणाऱ्या सभापतींनीच घटनाबाह्य वर्तन केल्याची टीका चोडणकर यांनी केली.

Web Title: The role of governor of Goa is out of Constitution says Chodankar