'रोती जनता हँसता मोदी'ची जोरदार चर्चा

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशातील नागरिक हवालदील झाले आहेत. 'रोती जनता हँसता मोदी' असा ट्रेण्ड ट्विटरवर टॉप टेन मध्ये आला असून, यावर जोरदार चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याने व 30 डिसेंबरपर्यंतच या नोटा बदलून मिळणार आहेत. या नोटा बदलून घेण्यासाठी बँका, एटीएम व पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची गर्दी उसळली आहे. उद्यापासून (ता. 18) दोन हजार रुपयांच्याच नोटा बदलून मिळणार आहेत. शिवाय, नोटा बदलून घेणाऱया व्यक्तीच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली जात आहे.

विविध बँका व एटीएमच्या रांगेत उभे राहिल्यामुळे आजपर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन जिवनात नागिरकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे ट्विटरवर 'रोती जनता हँसता मोदी' असा ट्रेण्ड आला आहे. या ट्रेण्डच्या माध्यमातून देशभरातील जनता चर्चा करत आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळे एटीएमच्या रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पाणी घेण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाला आहे. शिवाय, विविध व्यंगचित्रेही फिरताना दिसत आहेत.

Web Title: roti janta hasta modi trend on twitter