ड्रग्ज माफिया लागेबांधे प्रकरणी रॉय नाईक एसआयटीसमोर हजर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

तीन दिवसांपूर्वी एसआयटीने रॉय नाईक याला आज (29 जून) सकाळी 11 वाजता चौकशीस उपस्थित राहण्याचे समन्स पाठविले होते. अटकेच्या भीतीने त्याने काल संध्याकाळी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

गोवा - गोव्यात ड्रग्ज माफिया-पोलिस-राजकारणी यांच्यातील लागेबांधे संदर्भात रॉय रवी नाईक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते आज दुपारी 12.30 वा. क्राईम ब्राँचच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) चौकशीस उपस्थित राहिले. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. 

या प्रकरणात रॉय नाईक यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याने त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्याचा प्रश्नच येत नाही असे निरीक्षक करून अर्ज फेटाळला. तीन दिवसांपूर्वी एसआयटीने रॉय नाईक याला आज (29 जून) सकाळी 11 वाजता चौकशीस उपस्थित राहण्याचे समन्स पाठविले होते. अटकेच्या भीतीने त्याने काल संध्याकाळी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. राज्याचे माजी गृहमंत्री रवी नाईक यांचे ते सुपुत्र आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात हे ड्रग्ज माफिया-पोलिस-राजकारणी प्रकरण बरेच गाजले होते व रॉय नाईक यांचे नाव ड्रग्ज माफिया दलालांशी असल्याची चर्चा होत होती.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Roy Naik appearing before the SIT in the drug mafia case