मोदींच्या नोटबंदीचा फज्जा; व्यवहारातील रोकड झाली दुप्पट

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

देशात आता चलनव्यवस्थेत  18.5 लाख कोटी पेक्षाही जास्त रुपयांची रोकड आहे. जी आतापर्यंतच्या व्यवहारातली सर्वात जास्त आहे. नोटबंदीच्या काळाची विचार करायचा झाल्यास ही रोकड त्यावेळेस पेक्षा जवळपास दुप्पट आहे. नोटबंदीच्या काळात जनतेच्या हातातली रोकड कमी होऊन ती 7.8 कोटी रुपयांपर्यंत खाली आली होती.

नवी दिल्ली - देशात आता चलनव्यवस्थेत  18.5 लाख कोटी पेक्षाही जास्त रुपयांची रोकड आहे. जी आतापर्यंतच्या व्यवहारातली सर्वात जास्त आहे. नोटबंदीच्या काळाची विचार करायचा झाल्यास ही रोकड त्यावेळेस पेक्षा जवळपास दुप्पट आहे. नोटबंदीच्या काळात जनतेच्या हातातली रोकड कमी होऊन ती 7.8 कोटी रुपयांपर्यंत खाली आली होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर आकडेवारीनुसार ही माहिती बाहेर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहीतीनुसार, सध्या चलनात एकूण 19.3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड आहे. हाच आकडा नोटबंदीच्या काळात 8.9 लाख कोटी इतका कमी होता. 

विशेष बाब म्हणजे, काही दिवसापूर्वी देशात काही ठिकाणी चलन तुटवडा जाणवत होता. परंतु, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोकड उपलब्ध आहे. मिळालेल्या आकड्यानुसार नोटबंदीच्या काळात जेवढी रोकड होती त्याच्या आता दुप्पट रोकड उपलब्ध आहे. सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाने चलनातील जवळपास 86 टक्के नोटा बाद ठरवण्यात आल्या होत्या. 

Web Title: At Rs 18.5 lakh crore, cash with public at record high

टॅग्स