उत्तर प्रदेशात 22 लाख रुपयांची रोकड जप्त

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

लखनौ- उत्तर प्रदेशात वाहनांच्या तपासणीदरम्यान 22 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका होत आहे. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी तपास मोहिम हाती घेतली आहे. पोलिस अधीक्षक डीपीएन पांडे यांनी सांगितले की, 'गोपीगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मिर्झापूर रस्त्यावर पोलिस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका वाहनामधून 22 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली. पैशांबाबतची माहिती अथवा कागदपत्रे त्यांना देता आली नाही.'

कोईराना पोलिस स्टेशनच्या हद्दीतही 1.96 लाखांची रक्कम दोघांकडून जप्त करण्यात आली आहे. दुसऱया एका घटनेत एका वाहन चालकाकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, असेही पांडे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूकपुर्वी ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू असून, मोठ-मोठ्या रक्कमा हस्तगत करण्यात येत आहेत.

Web Title: Rs 22 lakh cash seized in poll-bound Uttar Pradesh