तृणमूल नेत्याविरुद्ध 25 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

यूएनआय
मंगळवार, 10 जानेवारी 2017

कोलकाता - चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी नाव ओढल्याने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सौगाता रॉय यांच्याविरुद्ध 25 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दाखल दावा केला आहे.

कोलकाता - चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी नाव ओढल्याने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सौगाता रॉय यांच्याविरुद्ध 25 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दाखल दावा केला आहे.

रोझ व्हॅली चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी सौगाता रॉय यांनी एका टीव्ही शोमध्ये सुप्रियो यांचा चीटफंड गैरव्यवहारशी संबंध असल्याचे म्हटले होते. तर, तृणमूलच्या आमदार मोहुआ मोईत्रा आणि चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले तृणमूलचे नेते तापस माल यांनीही आरोप केले होते. त्यामुळे सुप्रियो यांनी या तिन्ही नेत्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. रॉय आणि मोईत्रा यांच्यावर 25 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तर, मोईत्रा यांच्यावर 5 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. याबाबत बोलताना सुप्रियो म्हणाले, "माझ्या वकिलांनी तिघांनाही नोटीस पाठविली असून त्यावर सात दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे.'

तृणमूल नेते आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय आणि तापस पाल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने रोझ व्हॅली गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर अनेकांनी बाबूल सुप्रियो यांचे नाव या प्रकरणात घेत त्यांच्यावर आरोप केले होते. मात्र, आरोप करणाऱ्यांना आपले नाव या प्रकरणात घेण्यासाठी मानधन मिळत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता.

Web Title: Rs 25 croredefamation suits file against TMC senior leader Saugata Roy