esakal | PM किसान योजना: ४२ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले ३ हजार कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

PM किसान योजना: ४२ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले ३ हजार कोटी

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान योजनेतंर्गत (PM-KISAN Scheme) केंद्र सरकारने (central govt) ४२ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या (Ineligible Farmers) खात्यात पैसे जमा केल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकार आता हे सर्व पैसे परत मिळवण्याचा (Recovering Money) प्रयत्न करत आहे. ही रक्कम ३ हजार कोटी रुपयाच्या घरात आहे. सरकारकडून संसदेत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान किसान योजनेतंर्गत केंद्र सरकार ६ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात तीन समान हप्त्यामध्ये जमा करते. या योजनेतंर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्रतेचे काही निकष आहेत. (Rs 3,000 Cr Transferred to 42 Lakh Ineligible Farmers Under PM-KISAN Scheme Centre Now Recovering Money dmp82)

शेतकऱ्याचे उत्पन्न कर भरण्याइतके नसावे. ४२.१६ लाख अपात्र शेतकऱ्यांकडून २,९९२ कोटी रुपये परत मिळवायचे आहेत, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पीएम किसान योजनेतंर्गत पैसा मिळवणारे सर्वाधिक अपात्र शेतकरी आसाममधील (८.३५) आहेत. त्याखालोखाल तामिळनाडू (७.२२ लाख), पंजाब (५.६२ लाख), महाराष्ट्र (४.४५ लाख), उत्तर प्रदेश (२.६५ लाख) आणि गुजरात (२.३६) या राज्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आसाममधून ५५४ कोटी, पंजाबमधून ४३७ कोटी, महाराष्ट्रातून ३५८ कोटी, तामिळनाडूतून ३४० कोटी, यूपीतून २५८ कोटी आणि गुजरातमधून २२० कोटी परत मिळवायचे आहेत. योजनेचा आढावा घेताना काही इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभा मिळाल्याचे लक्षात आले, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत सांगितले.

हेही वाचा: मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?

पीएम किसान योजनेची व्यवस्थित अमलबजावणी व्हावी व कुठेही निधीचा गैरवापर होऊ नये, यासाठी विशेष उपायोजना करण्यात आल्याचे तोमर यांनी सांगितले. खऱ्याखुऱ्या गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. यासाठी पैसे परत मिळवण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी अपात्र शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत.

loading image