मोदींची परदेशवारी 'लय भारी' ! खर्च तब्बल 355 कोटींचा

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

पंतप्रधान मोदींचा फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा दौरा सर्वात महागडा ठरला असून, या दौऱ्यासाठी 31 कोटी 25 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला. तसेच भूतान दौऱ्यावर सर्वात कमी 2 कोटी 45 लाख खर्च झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यापासून आत्तापर्यंत 41 परदेश दौरे केले असून, त्यांच्या या दौऱ्यांसाठी तब्बल 355 कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोदींचे दौरे आणि त्याच्या खर्चाची माहिती माहिती अधिकारांतर्गत समोर आली आहे. तसेच पंतप्रधान मोदी मागील चार वर्षांमध्ये 165 दिवस परदेशात असल्याची बाबही यामधून समोर आली आहे. 

Modi in plane

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे आणि त्या दौऱ्यावर होणारा खर्च याबाबतची माहिती बंगळुरुतील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितली होती. त्यानुसार ही बाब समोर आली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी गेल्या चार वर्षांमध्ये 41 परदेश दौरे केले असून, 50 देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यांसाठी एकूण 355 कोटी रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.   

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा दौरा सर्वात महागडा ठरला असून, या दौऱ्यासाठी 31 कोटी 25 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला. तसेच भूतान दौऱ्यावर सर्वात कमी 2 कोटी 45 लाख खर्च झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Web Title: Rs 355 crore spent on Modis 41 foreign trips since becoming PM