पाचशेच्या नोटेची दुसरी बाजू कोरीच...

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

भोपाळ (मध्य प्रदेश)- खारगोन जिल्ह्यातील एका गावामध्ये असलेल्या एटीएममधून शेतकऱयाने पैसे काढले. मात्र, पाचशे रुपयांच्या नोटा एका बाजूने कोऱया असल्याचे दिसून आले. यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटानंतर पाचशे रुपयांच्या नोटांवरील छपाईमधील त्रुटी आढळून आल्या आहेत.

दोन हजार रुपयांच्या नोटांवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र गायब असल्याचे मध्यंतरी आढळून आले होते. याघटनेनंतर पाचशे रुपयांच्या नोटांबाबतही असाच प्रकार घडला आहे.

सेगाव या गावामधील शेतकरी हेमंत सोनी यांनी मंगळवारी (ता. 10) रात्री एटीएममधून दीड हजार रुपये काढले. एटीएममधून पाचशे रुपयांच्या तीन नोटा त्यांना मिळाल्या. नोटा तपासल्यानंतर दोन नोटा एका बाजूने कोऱया असल्याचे लक्षात आले. दुसऱया दिवशी त्यांनी बँकेत जाऊन तक्रार दाखल केली. बँकेने त्यांना नोटा बदलून दिल्या आहेत.

बँकेच्या अधिकाऱयांनी सांगितले की, 'छपाईमधील त्रुटींमुळे ही घटना घडली असावी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आम्हाला या नोटा दिल्या होत्या. शेतकऱयाच्या तक्रारीनंतर आम्ही त्यांना नोटा बदलून दिल्या आहेत. परंतु, याबाबतची आम्ही चौकशी करत आहोत.'

Web Title: Rs 500 with one side blank