उत्तर प्रदेशात एक लाखाला 60 हजारांचा भाव !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर काळ्या पैशावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. काळा पैसा बाजारात आणण्यासाठी एक लाखाला 60 हजार रुपयांचा भाव फुटला आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (शुक्रवार) दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अलाहाबाद, लखनौ, गाझियाबाद व नोएडामध्ये एक लाखाला 60:40 असा भाव फुटला आहे. काळा पैसा असणारे अनेकजण नवनवीन ग्राहक शोधून त्यांच्याकडे हजार व पाचशेच्या नोटा सुपूर्द करत आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळे भाव फुटले आहेत. 30 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत भाव आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोठी चेन तयार झाली आहे. या चेनच्या जाळ्यात अनेकजण अडकले आहेत. जमिनी खरेदी-विक्री व विविध प्रकारचे व्यावयायिक आपला पैसा पांढरा करताना दिसत आहेत.'

दरम्यान, काळा पैसा नियमित करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत असल्याची दखल अर्थ मंत्रालयाने घेतली आहे. यापुढे अशा व्यक्तींवर कारवाई करणार असल्याची माहिती ट्विटरवरून आज (शुक्रवार) दिली आहे.

Web Title: Rs 60,000 is the new Rs 1 lakh in Uttar Pradesh