तेलंगणाच्या आमदारांचे शिक्षण पाहून व्हाल थक्क! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत जास्त सुशिक्षित आमदार देण्याचा विक्रम केला आहे. एकूण 119 जागांपैकी 88 जागांवर विजय मिळवला होता.

हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत जास्त सुशिक्षित आमदार देण्याचा विक्रम केला आहे. एकूण 119 जागांपैकी 88 जागांवर विजय मिळवला होता.

तेलंगणा राष्ट्र समितीच्या एकूण 88 आमदारांपैकी 2 जणांनी डॉक्टरेट घेतलेली आहे. 24 आमदार हे पदव्युत्तर आहेत, तर 44 जण हे पदवीधारक आहेत. यामध्ये चार डॉक्टर, पाच अभियंते आणि नऊ वकिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच हा तेलंगणा राष्ट्र समितीने केलेला मोठा विक्रम आहे. देशातील सर्वात जास्त शिक्षित सरकार तेलंगणाला देणार आहेत.

तेलंगणा विधानसभेतील एकूण 119 आमदारांपैकी 58 टक्के आमदार हे उच्च शिक्षण घेतलेले आहेत. दरम्यान, आपण नेहमी अनेक राज्यातील आमदार आणि खासदार हे अशिक्षित असलेलेच पहायला मिळतात. परंतु, तेलंगणातील जनतेने देशासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी चांगल्या आणि उच्च शिक्षित लोकांनाचा निवडून देण्याचा केलेला प्रयत्न यातून दिसतो.

उच्च शिक्षित लोकांना निवडून देण्याची गोष्ट खूप कमी राज्यात घडून आलेली पहायला मिळाली आहे. परंतू, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा पंजाब, ओडिशा या राज्यांतील लोकांचा कल बऱ्यापैकी उच्चशिक्षित लोकांना निवडुन देण्याकडे  दिसून आलेला आहे. परंतु आता तर तेलंगणातील मतदारांनी देशासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.

Web Title: RS sets record for more educated MLAs