मुस्लिम मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्यासाठी RSS चा पुढाकार

मुस्लिम महिलांचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशभरात प्रचार करणार आहे.
मुस्लिम विवाह
मुस्लिम विवाहटिम ई सकाळ

सध्या देशात मुस्लिम महिलांचा प्रश्न ऐरणीवर आहे.देशातील मुस्लिम समाजात तिहेरी तलाक,एक पेक्षा जास्त विवाह पध्दती, हिजाब, मुलींचे लग्नाचे विवाह विवाह याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.आता आरएसएसच्या (RSS) जवळच्या समजल्या जाणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने मुस्लिम महिलांसाठी पुढाकार घेतलाय. मुस्लिम महिलांचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशभरात प्रचार करणार आहे.

मुस्लिम महिलांच्या लग्नाच्या वयांवरुन अनेक प्रश्नचिन्ह होते. आता यावर मुस्लिम राष्ट्रीय मंच मुस्लिम महिलांचे विवाहाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशव्यापी मोहीम राबवणार आहे. जेणेकरून या विषयाला जनआंदोलन करता येईल.

मुस्लिम विवाह
Video: भारतीय लष्कराकडून गुलमर्गमध्ये हिवाळी महोत्सवाचे आयोजन

आरएसएसच्या (RSS) जवळच्या समजल्या जाणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंच या मोहिमेअंतर्गत मशिदीमध्ये महिलांना नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र जागा बनवण्याच्या मागणीसाठी जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. मंचाने म्हटले आहे की, देशातील मुस्लिम समाज तिहेरी तलाक, एक पेक्षा जास्त विवाह पध्दती, हिजाब, मुलींचे लग्नाचे वय इतर अनेक बाबींबाबत जागरूक झाला आहे. या मंचाने या सर्व प्रकरणांवर देशव्यापी चर्चा करण्याचे आवाहन केले.

मुस्लिम विवाह
युक्रेनमधील भारतीय डॉक्टरचा मोठा निर्णय, होतंय कौतुक

मंच म्हणतात, “सुशिक्षित आणि प्रगतीशील कुटुंबांव्यतिरिक्त, मुस्लिम मुलींचा लहान वयातच विवाह करतात, मुस्लिम राष्ट्रीय मंचनी दावा केला की,ग्रामीण भागातील अनेक मुलींचे वय 12-13 वर्षे असताना विवाह केले जातो आणि 20 वर्षे वयापर्यंत त्यांना अनेक मुले होतात.हे चुकीचे आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांचे विवाहाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशव्यापी मोहीम राबवणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com