RSS सुरु करणार सैनिकी शाळा; घडविणार लष्करी जवान

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

शाळेची स्थापना उत्तर प्रदेश बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे. याच ठिकाणी 1922 रोजी रज्जू भैया यांचा जन्म झाला आहे. शाळा उभारण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. ही एक होस्टल प्रकारातली शाळा असून, इथे सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढील वर्षापासून सैनिकी शाळा सुरु करण्याच्या तयारीत असून, या शाळेत तयार होणारे विद्यार्थी पुढे लष्करात देश कर्तव्य बजाविताना दिसणार आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील वर्षी एप्रिलमध्ये संघ सैनिकी शाळा सुरु करण्याच्या तयारीत आहेत. या शाळेत मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी संघाच्या विद्या भारतीकडे देण्यात आली आहे. संघप्रचारक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भय्या यांच्या नावावरून या शाळेचे नाव रज्जू भैय्या सैनिक विद्यामंदिर ठेवण्यात येणार आहे. 

शाळेची स्थापना उत्तर प्रदेश बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे. याच ठिकाणी 1922 रोजी रज्जू भैया यांचा जन्म झाला आहे. शाळा उभारण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. ही एक होस्टल प्रकारातली शाळा असून, इथे सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे. आरएसएसचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास देशातल्या दुसऱ्या राज्यांतही अशा प्रकारच्या शाळा उघडल्या जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Army school from next April Ist batch to have 160 students