श्रीरामाच्या घोषणाबाजीने भागणार नाही : मोहन भागवत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहन भागवत
श्रीरामाच्या घोषणाबाजीने भागणार नाही : मोहन भागवत

श्रीरामाच्या घोषणाबाजीने भागणार नाही : मोहन भागवत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीने भागणार नाही तर आपले आचरणही प्रभू रामासारखे असायला हवे , अशा कानपिचक्या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्या आहेत.दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या संत ईश्वर सन्मान कार्यक्रमात भागवत यांच्या भाषणादरम्यान काही जणांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरवात कली. त्यांना तत्काळ थांबवत भागवत म्हणाले, की केवळ घोषणांनी चालणार नाही, तर आपले आचरणही प्रभू श्रीरामासारखे असेल असे प्रयत्न प्रत्येकाने करायला हवेत. त्यामुळे जनतेची निःस्वार्थ सेवा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करून भागवत म्हणाले, की सेवेत ‘जोश'' नसून ‘होश'' असणे आवश्यक आहे. जनसेवेत अहंकाराला थारा नाही, असेही सरसंघचालकांनी सूचकपणे सांगितले.

हेही वाचा: Farm Bills: 'तो अहवाल सार्वजनिक करा'; अनिल घनवट यांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

१३० कोटी लोकसंख्येच्या भारतातील नागरिक प्राचीन काळापासून येथील जमीन व देश यांना आपले मानतात. त्यामुळेच विविधतेने नटलेला हा देश एकसंध आहे. मात्र देशाने विकासाच्या प्रगतिपथावर मार्गस्थ होण्याचे काम गेल्या ७५ वर्षांत केले नाही, असेही ते म्हणाले.

loading image
go to top