शैक्षणिक धोरणाबाबत भागवतांकडून मोदी सरकारला सूचना

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat

नवी दिल्ली : पोट भरण्याची विद्या नसून नव्या पिढीमध्ये उद्यम, साहस आणि धैर्य या गुणांचे रोपण करणे गरजेचे आहे आणि भारतीय शिक्षण व्यवस्था ही अशीच असली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

संघाच्या शिक्षण संस्कृती उत्थान अभ्यास तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानू सभांमध्ये बोलताना डॉ. भागवत यांनी प्रस्तावित नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला अनेक सूचना केल्या. याप्रसंगी शालेय पातळीपासून यूपीएससी पर्यंतच्या अनेक शिक्षण प्रमाणमधील विकृती नष्ट करण्यासाठी आणि शिक्षणात भारतीयत्व आणण्यासाठी प्रकाशित केलेल्या पुस्‍तकांचे विमोचन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे सीतानाथ गोस्वामी आणि अनिता शर्मा या शिक्षणतज्ञांना मदनमोहन मालवीय सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेचे अतुल कोठारी, दीनानाथ बात्रा उपस्थित होते.

भागवत यांनी सांगितले, की भारतात ज्या पद्धतीची शैक्षणिक साक्षरता आणि शैक्षणिक चिंतन आहे त्यापेक्षा वेगळे आहे. भारतीय शिक्षण प्रणाली ही परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवण्यापेक्षा जीवनाला भेटण्यासाठीचे नागरिक तयार करण्यावर भर देते. माणूस स्वत:ला जवा गौरवाच्या भावनेने पाहतो. मुक्त आणि स्वावलंबी होतो, म्हणजे नकाशातले केवळ चित्र नसून संस्कृतीचे विविध धागे तात भारतीय आहे आणि हीच भारतीयता शिक्षण पद्धतीतही विपरीत आहे. भारतीय त्यांची मुले हजारो वर्षांपासून शाश्वत आहेत ज्ञान हे सत्याला जाण्यासाठी असावे आणि उपभोगासाठी नसावे. त्याचप्रमाणे विचार आणि सत्य आचार उभे राहिलेले शिक्षण हे व्यापारी पद्धतीने दिले जाऊ शकत नाही. नाही केवळ साक्षर असणे चांगले आणि निरक्षर असणे वाईट ही भावना चुकीची आहे. कारण, हजारो उच्चशिक्षितांची सुशिक्षितांची पोटे भरणारे पण रुढार्थाने अशिक्षित असे सर्वत्र दिसतात. 

शिक्षण किंवा ज्ञानार्जन ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे हे विद्यार्थी आणि शिक्षण संस्था चालवणारे यांनी नीट लक्षात घेतले पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण ठरवताना त्यामध्ये भारतीयत्वाचा भाव आवश्यक आहे. हे सरकारने ध्यानात ठेवले पाहिजे असेही भागवत यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com