Ayodhya Verdict : जय किंवा पराजय म्हणून निकालाकडे पाहू नका : भागवत

वृत्तसंस्था
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला. सत्य आणि न्यायाचा न्यायाधीशांकडून आदर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयाने न्याय मिळाला आहे. संयमाने या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या भारतीय जनतेचे कौतुक आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत करण्यात येते. या निकालाकडे जय किंवा पराजय म्हणून बघितले पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

बाबरी मशिदीच्या जागेत मंदिराचे अवशेष : सुप्रिम कोर्ट

अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असून, याठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट बनवावे लागणार आहे. तसेच अयोध्येत सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहे. संघाकडूनही या निकालाचे स्वागत करताना देर आए दुरुस्त आए असे म्हणण्यात आले आहे.

Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

मोहन भागवत म्हणाले, की न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला. सत्य आणि न्यायाचा न्यायाधीशांकडून आदर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयाने न्याय मिळाला आहे. संयमाने या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या भारतीय जनतेचे कौतुक आहे. न्याय आणि कायद्याच्या मर्यादेत राहून प्रत्येक या निर्णयाचे स्वागत करावे. रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिरासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. संयमित आणि सात्विक पद्धतीने आनंद साजरा करावा. भूतकाळ विसरून सगळे एकत्र येऊया.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Chief Mohan Bhagwat We welcome this decision of Supreme Court on Ayodhya Verdict