
श्यामल रॉय
कोलकाता : तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गडाला २०११ मध्ये हादरे दिल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाची पोकळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरून काढल्याचे चित्र आहे. संघाच्या पश्चिम बंगालमध्ये केवळ ८३० शाखा होत्या आणि २००६ पूर्वी तर त्या ५०० हूनही कमी होत्या. २०१६च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पश्चिम बंगालमध्ये आणखी घट्ट पाय रोवले आणि जानेवारी २०१७ पर्यंत शाखांची संख्या १,४९६ वर पोचली. संघ आपल्या सहयोगी संस्थांमार्फत राज्यभर भूमिका पुढे नेत आहे. या संघटना विविध क्षेत्रांमध्ये आहेत.