आरएसएसची पहिल्यांदाच जम्मूमध्ये बैठक

पीटीआय
बुधवार, 17 मे 2017

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि विश्‍व हिंदू परिषदचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 18 ते 20 जुलैदरम्यान तीन दिवसांच्या बैठकीचे संघाचे नियोजन असल्याची माहिती "आरएसएस'चे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिली

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यांदाच जम्मूमध्ये वार्षिक आढावा बैठक आयोजित करणार असून, ही बैठक जुलैमध्ये घेण्यात येईल. या बैठकीद्वारे काश्‍मीर खोरे हे भारताचा अविभाज्य घटक असून, तसा फुटीरतावाद्यांना संदेश देण्यात येणार असल्याचे "आरएसएस'चे नियोजन आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि विश्‍व हिंदू परिषदचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 18 ते 20 जुलैदरम्यान तीन दिवसांच्या बैठकीचे संघाचे नियोजन असल्याची माहिती "आरएसएस'चे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिली. "आरएसएस' भारताच्या एकात्मतेसाठी कायमच पुढाकार घेणार असल्याचेही वैद्य यांनी या वेळी सांगितले.

या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात येणार नसले, तरी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: RSS to have an annual meeting in Jammu for the first time ever