राहुल गांधींची मानसिक अवस्था ठीक नाही: संघ

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांचे मानसिक संतुलन बिघडले नसल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.

"हे लोक (संघ आणि भाजप) असा विचार करतात की ते द्वेष आणि भीती पसरवून सत्ता मिळवतील. "भीतीचे रुपांतर रागात करणे हा त्यांच्या राजकारणाचा गाभा आहे. हे केवळ गेल्या दोन-अडीच वर्षांत घडत नसून मागील हजारो वर्षांपासून सुरू आहे. कॉंग्रेस त्यांच्याविरुद्ध लढेल आणि त्यांचा सत्ता मिळवेल. आम्ही त्यांचा द्वेष करणार नाहीत, तर त्यांच्या विचारसरणीशी संघर्ष करणार आहोत.', अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राहुल सिन्हा म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचासरणी जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांना सुरुवातीपासूनचे राजकारण शिकावे लागेल. राहुल गांधी हे मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाहीत. नेहरू-गांधी कुटुंबियांमध्ये राहुल गांधी यांची बुद्धिमत्ता सर्वांत कमी आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी संघाविरूद्ध कधीही अशा प्रकारची भाषा वापरली नाही.'

Web Title: RSS hits back at 'mentally unstable' Rahul Gandhi