केरळमध्ये PFI नेत्याच्या हत्येनंतर काही तासातच RSS कार्यकर्त्याची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rss leader murdered in kerala palakkad pfi leader was murdered a few hours ago

केरळ : PFI नेत्याच्या हत्येनंतर काही तासातच RSS कार्यकर्त्याची हत्या

केरळमधील पलक्कड जिल्ह्यात शनिवारी एका RSS कार्यकर्त्याची ची हत्या करण्यात आली. याच्या काही तासांपूर्वी याच जिल्ह्यात एका पीएफआय नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी सांगितले की आरएसएसचे कार्यकर्ता एसके श्रीनिवासन यांच्यावर सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मेलमुरी येथील मोटरसायकलच्या दुकानात हल्ला केला. या घटनेच्या काही तास आधी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या एका नेत्याची जवळच्या गावात हत्या करण्यात आली होती. दुपारी आरएसएस नेत्याच्या हत्येनंतर स्थानिक लोकांनी आजूबाजूच्या भागातील दुकाने बंद केली आणि पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला.

टीव्ही चॅनलनी दाखवलेल्या जवळपासच्या दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की हल्लेखोर तीन मोटरसायकलवरून दुकानात पोहोचले आणि तिघांनी श्रीनिवासन यांच्यावर हल्ला केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याच्या हत्येनंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी व्यापक छापेमारी सुरू केली आहे. एडीजीपी विजय साखरे पलक्कड शहरात पोहोचतील आणि 24 तासांच्या आत झालेल्या दोन राजकीय खुनाच्या तपासात समन्वय साधण्यासाठी तेथेच राहणार आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, केरळ सशस्त्र पोलीस-1 (KAP-1) च्या तीन कंपन्यांना पलक्कड येथे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: "हे आरोप बिनबुडाचे"; PM मोदींवरील आरोपांवर विरोधकांना भाजपचे प्रत्युत्तर

सुरक्षा उपायांचा भाग म्हणून सशस्त्र पोलीस बटालियनचे सुमारे 270 सदस्य पलक्कड येथे तळ ठोकून आहेत. दरम्यान, आदल्या दिवशी झालेल्या सुबैर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी चार आरएसएस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज अदा करून घरी परतत असताना जिल्ह्यातील एलाप्पल्ली येथे 43 वर्षीय सुबैर यांची हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा: "PM मोदी गप्प का आहेत"; 13 विरोधी पक्षांचा सरकारवर एकत्रित हल्लाबोल

येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पीएफआय नेत्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पीएफआय कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत सुबैर यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. आपल्या नेत्याच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप पीएफआयने शुक्रवारी केला होता. आरएसएस नेत्यावर सूड म्हणून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात? पराभवानंतर चर्चेला उधाण

Web Title: Rss Leader Murdered In Kerala Palakkad Pfi Leader Was Murdered A Few Hours Ago

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KeralaRSS
go to top