मुलींच्या लग्नाच्या वयावरुन मोदी-RSS मध्ये मतभेद

मुलींच्या विवाहाच्या वयावर मोदी-RSS मध्ये मतभेद असल्याची माहिती संघाच्या एका नेत्याने दिली
RSS and Modi Government
RSS and Modi Governmentसकाळ डिजिटल टिम

भारतातील लग्नासाठी मुलींच्या वयाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि मोदी यांच्यामध्ये भेद असल्याचे मोठे वक्तव्य संघाच्या एका नेत्याने केले आहे. वार्षिक बैठकीपूर्वी संघाने हे स्पष्ट केले आहे, “महिलांच्या विवाहाच्या वयावर केंद्राच्या प्रस्तावित कायद्यावरून त्यांचे मतभेद आहे. असे प्रश्न समाजावर सोडले पाहिजेत.”

आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले,“सध्या मुलींच्या लग्नाच्या वयाचा मुद्दा चर्चेत आहे.यावर अनेक मान्यता आहे.आदिवासी किंवा ग्रामीण भागात लग्न लवकर होतात. यामागील कारण म्हणजे सरकारी शिक्षण (Government Education) आणि लवकर गर्भधारणा (Pregnancy). अशा प्रकरणांमध्ये सरकारने किती हस्तक्षेप करायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही गोष्टी समाजावर सोडल्या पाहिजेत."

RSS and Modi Government
हायकोर्टाचा मोठा निर्णय; आक्षेपार्ह पोस्टला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन नसणार जबाबदार

देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) मंजुरी दिली आहे यासाठी सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com