केरळच्या 'CM'चे शीर आणा, 1 कोटी मिळवा- RSS

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

केरळच्या मुख्यमंत्र्यांना मारून त्यांचे शीर आणणाऱ्याला एक कोटी रुपये देऊ. हे बक्षिसाचे पैसे देण्यासाठी मी माझी मालमत्ता विकेन, असेही कुंदन चंद्रकांत म्हणाले. 

तिरुअनंतपुरम / उज्जैन : केरळच्या मुख्यमंत्र्यांना मारून त्यांचे शीर आणणाऱ्याला एक कोटी रुपये देऊ, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निदर्शनांदरम्यान त्यांच्या आंदोलनाचे प्रमुख कुंदन चंद्रकांत यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना मारणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. या धक्कादायक घोषणेमुळे राजकीय खळबळ उडाली. 

केरळमधील शाहीद पार्क येथे RSSच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यावेळी उज्जैन येथील खासदार चिंतामण मालवीय, भाजपचे आमदार मोहन यादव आणि RSSचे इतर नेते उपस्थित होते. संघाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

वादग्रस्त विधानांवरून टीकेची झोड उठल्यानंतरही कुंदन चंद्रकांत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही. जे बोललो आहे ते बरोबरच आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 
केरळच्या मुख्यमंत्र्यांना मारून त्यांचे शीर आणणाऱ्याला एक कोटी रुपये देऊ. हे बक्षिसाचे पैसे देण्यासाठी मी माझी मालमत्ता विकेन, असेही ते म्हणाले. 
आपले राष्ट्रीयत्व अबाधित राखून हे वक्तव्य केले असल्याचे मत चंद्रकांत यांनी व्यक्त केले. 
 

Web Title: RSS spokesperson announces bounty on Kerala CM Pinarayi Vijayan's head