आरएसएस दहशतवादाचे प्रतीक : काँग्रेस आमदार

RSS is symbol of terrorism says Congress MLA Sunderlal Tiwari
RSS is symbol of terrorism says Congress MLA Sunderlal Tiwari

नवी दिल्ली : ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) दहशतवादाचे प्रतीक असलेली संघटना आहे. तसेच आरएसएस ही अशी संघटना आहे जिने महात्मा गांधींची हत्या केली'', असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार सुंदरलाल तिवारी यांनी आज (मंगळवार) केला. आरएसएसकडून देशात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, असेही ते म्हणाले. 

सुंदरलाल तिवारी हे मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यातील गुढ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आरएसएसवर टीका करताना ते म्हणाले, ''या संघटनेने देशाचे काहीही भले केलेले नाही. फक्त धार्मिक तेढ पसरविणे त्यांना आवडते. आरएसएस ही अशी संघटना आहे, ज्या संघटनेने महात्मा गांधींची हत्या केली. आरएसएस दहशतवादाचे प्रतीक असलेली संघटना आहे. त्यांच्याकडून देशात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. आरएसएसने कधीही तिरंगा फडकवला नाही''.

दरम्यान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आरएसएसवर बंदी आणणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यानंतर आता काँग्रेस आमदाराने हे वक्तव्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com