Bhagwant Mann Navjot Singh Sidhu
Bhagwant Mann Navjot Singh Sidhuesakal

भगवंत मान म्हणजे ‘रबराची बाहुली’; सिद्धूंची खणखणीत टीका

मान सत्तेत आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेत कमालीची घट झाल्याचा दावाही सिद्धू यांनी केला आहे.

चंदीगढ : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, सिद्धू यांनी भगवंत मान यांची तुलना रबराच्या बाहुलीसोबत (Rubber Doll) केली असून, दिल्लीतून आपच्या (AAP) नेतृत्वाखाली पंजाबमध्ये सरकार चालत असल्याचा विरोधकांचा आरोपही यावेळी सिद्धू यांनी योग्य ठरवला आहे. मान सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेत कमालीची घट झाल्याचा दावाही सिद्धू यांनी केला आहे. (Navjot Sidhu Dig At Bhagwant Mann )

Bhagwant Mann Navjot Singh Sidhu
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांविरोधात 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल

सिद्धू यांच्यासह माजी आमदार नवतेज सिंग चीमा आणि अश्विनी सेखरी यांनी चंदीगडमध्ये पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह विविध मुद्दे उपस्थित केले. सिद्धू म्हणाले की, मान सरकारच्या काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था झपाट्याने ढासळत आहे. गेल्या महिनाभरात राज्यात 40 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी सिद्धू यांना मान यांना पंजाबची काळजी आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना सिद्धू यांनी मान म्हणजे 'रब्बर का गुड्डा' झाले आहेत, अशा शब्दात सिद्धू यांनी टीका केली.

Bhagwant Mann Navjot Singh Sidhu
झारखंडमध्ये अवैध कोळसा खाणीत अपघात; अनेक जण अडकल्याची भीती

'आप' कडून पोलिसांचा वापर आणि राजकारण

केजरीवाल यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी पंजाब सरकार पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोपही यावेळी सिद्धू यांनी केला. “आप पोलिसांचा वापर करून राजकारण करत असून, पक्षाच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.

कुमार विश्वास आणि लांबांना समन्स

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आपचे माजी नेते कुमार विश्वास (Kumar Vishwas) आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर सिद्धू यांनी हे वक्तव्य केले आहे. या दोन्ही नेत्यांना 26 एप्रिलला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com