रुईया यांना 14 दिवसांची कोठडी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

कोलकाता : रुईया समूहाचे अध्यक्ष पवन रुईया यांना आज बराकपूर न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

कोलकाता : रुईया समूहाचे अध्यक्ष पवन रुईया यांना आज बराकपूर न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

रेल्वेच्या कारखान्यातून झालेल्या चोरीप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी रुईया यांना अटक केली होती. रेल्वेच्या डमडम येथील जेसोप कारखान्यातून रेल्वेच्या मालकीचे 50 कोटी रुपयांचे साहित्य चोरीस गेले होते. त्याची तक्रार रेल्वे मंत्रालयाने दिल्यानंतर रुईया यांच्यावर कारवाई करण्यात आली. रुईया यांची सविस्तर चौकशी करण्याची गरज असून, त्यांना कोठडी मिळावी, अशी मागणी सीबीआयने आज न्यायालयात केली. ती न्यायालयाने मान्य करीत वरील आदेश दिले.

दरम्यान, रुईया यांच्या विरोधात काही नवीन आरोपही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी सीबीआयने रुईया यांना चौकशीसाठी चार वेळा बोलावणे धाडले होते, मात्र रुईया यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

Web Title: ruia gets 14 days custody