माध्यमांसाठी नियमावली लोकशाहीसाठी योग्य नाही : भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

कर्नाटक सरकारने माध्यमांसाठी नियमावली तयार करण्याच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांसाठी नियमावली लोकशाहीसाठी योग्य नसल्याची टीका भाजपने केली आहे.

बंगळूर (कर्नाटक) - कर्नाटक सरकारने माध्यमांसाठी नियमावली तयार करण्याच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांसाठी नियमावली लोकशाहीसाठी योग्य नसल्याची टीका भाजपने केली आहे.

कर्नाटकमधील दोन्ही सभागृहातील सदस्यांनी प्रसारमाध्यमे बेजबाबदारपणे वार्तांकन करत असल्याबद्दल माध्यमांवर टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांसाठी नियम व अटी तयार करण्यासाठी कर्नाटक विधानसभेने नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते सुरेश कुमार म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत हा प्रकार योग्य नाही. मी विधानसभा अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. काय झाले आहे आणि काय आवश्‍यक आहे, यावर त्यांनी विचार करावा. ही समिती स्थापन करण्याचे काय कारण आहे, हे कोणालाही समजेनासे झाले आहे. तक्रारकर्ता हा फिर्यादी असतो. येथे फिर्यादी हाच शिफारशींच्या स्वरुपातील निर्णय देत आहे.'

इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांसाठी "लक्ष्मण रेषा' आखून देण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. बी. कोलीवाड यांनी दिली. माध्यमांना अभिव्यक्तीचा घटनात्मक अधिकार लक्षात स्वैरपणे करण्यात येणाऱ्या वार्तांकनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही समिती नियमावली सादर करणार असल्याचेही कोलीवाड यांनी सांगितले आहे. माध्यमांमध्ये या प्रकाराबद्दल नाराजी असून "माध्यमांच्या स्वातंत्र्याला हा गंभीर धोका आहे', अशा प्रतिक्रिया प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य कृष्णा प्रसाद यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Rules for media is not healthy in democratic setup : BJP