पर्रीकर यांच्याविषयी अफवा, एकाला अटक

विलास महाडिक
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पणजी (गोवा) - वास्को येथील केनेथ सिल्वेरा यानी फेसबूकवर पकर यांच्याबाबत पर्रीकर खोटी माहिती पोस्ट केल्याप्रकरणी सीआयडी क्राईम ब्रांचने काल रात्री त्यांना अटक केली.

क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत केनेथ सिल्वेरा याने काल स्वतःच्या फेसबूकवर अकाऊंटवर इंग्रजीत जस्ट गॉट न्यूज पर्रीकर नो मोर असा मेसेज पोस्ट केला होता. या मेसेजनंतर अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत क्राईम ब्रँचने कलम ५०५ खाली संशयित केनेथ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

संशयित केनेथ सिल्वेरा याला काल क्राईम ब्रँचने बोलवून या फेसबूकवरील मजकूरबाबत सखोल चौकशी केली मात्र तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्याने हा मजकूर का पोस्ट केला व त्यामागील हेतू काय होता याचेही तो स्पष्टीकरण देऊ शकला नाही. 

यावर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ओरिकेत उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबाबत व्हट्सअॅपवर चुकीचा मजकूर पाठविण्यात आला होता. याप्रकरणीही क्राईम ब्रँचकडे तक्रार दाखल झाल्यावर एका पत्रकाराची चौकशी झाली होती. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे.

Web Title: Rumor about Parrikar, One arrested