'रुपयाची घसरण थांबता थांबेना'

वृत्तसंस्था
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया 34 पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर 73.34 असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.

नवी दिल्ली- रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया 34 पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर 73.34 असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची दिवसेंदिवस घसरण होत असल्याने याचा परिणाम सर्वत्र होताना दिसत आहे. देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 83.73 रुपये आणि डिझेलचा दर 75.09 या आतापर्यंतच्या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर पोचला.
 
रुपयाच्या निचांकी घसरणीचा परिणाम सर्वत्र होताना दिसत आहे.  स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही आजपासून वाढ झाली. अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 502 रुपयांवर गेला आहे. याचबरोबर विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 59 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 879 रुपयांवर गेला आहे. गॅस सिलिंडरच्या दरातील ही सलग पाचव्या महिन्यांतील दरवाढ आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये ग्राहकांना प्रतिसिलिंडर 320.49 रुपये अंशदान मिळत होते. आता ऑक्‍टोबरमध्ये हे अंशदान 376 रुपये झाले आहे. त्याचबरोबर, रुपया महागल्याने आयात, परदेशातील प्रवास, परदेशातील शिक्षण महागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupee plunges to new record low