रुपया निच्चांकी पातळीवर अन् अर्थमंत्री म्हणतात, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूतीने उभा

Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSakal

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेच रुपयांच्या मुल्याची निचांकी घसरण झालेली असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची निचांकी घसरण झाला आहे. मात्र शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जगातील इतर चलनांपेक्षा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक मजबूत झाल्याचं विधान केलं आहे.

Nirmala Sitharaman
Mohan Bhagwat: आमच्या भूमीत हिटलर असूच शकत नाही, जर असला तरी...; भागवत यांचं विधान

डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंतम आज ८१.२६ पैशांपर्यंत खालावली आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीवर रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालय लक्ष ठेवून असताना अर्थमंत्री सीतारमण यांनी केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Rupee falls to record low vs dollar after US Fed hike)

सीतारमण म्हणाल्या की, चलनातील चढउताराच्या सध्याच्या स्थितीत जर जागतिक पातळीवर कोणत्या चलनाने आपली स्थिती चांगली राखली असेल तर तो भारतीय रुपया आहे. आम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. रुपयाच्या घसरणीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, सध्याच्या घसरणीच्या काळात डॉलरच्या तुलनेत इतर चलनांच्या स्थितीचा अभ्यास करण्याची गरज आहे.

Nirmala Sitharaman
...तर तुम्हाला पंतप्रधान, राष्ट्रपतीही वाचवू शकणार नाही; मिथून चक्रवर्तींचा ममतांना इशारा

शनिवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.26 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी रुपया एकाच दिवसात 83 पैशांनी घसरला होता, जी गेल्या सात महिन्यांतील सर्वात मोठी घसरण होती.

वर्षाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेल्या राजकीय तणावामुळे डॉलरच्या तुलनेत इतर चलनांची स्थिती कमकुवत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केल्याने चलनांवर दबाव वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com