बॅंकांमध्ये ठेवींच्या महापूराची शक्‍यता

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर नोटा बदलून घेण्यासह बॅंकेत नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली असून त्यामुळे बॅंकेकडे ठेवींचा महापूर येण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर नोटा बदलून घेण्यासह बॅंकेत नोटा जमा करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली असून त्यामुळे बॅंकेकडे ठेवींचा महापूर येण्याची शक्‍यता आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर काही आर्थिक बंधने लागू करण्यात आली आहेत. त्यामध्ये नागरिकांना दिवसाला चार हजार रुपयांहून अधिक पैसे काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय स्वत:कडील जुन्या नोटा किंवा रोख रक्कम बॅंकेत जमा करणे अनिवार्य ठरले आहे. या सर्व बाबींमुळे बॅंकांमधील ठेवींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ठेवींमध्ये 4.3 टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे. तिमाही आधारावर त्यात 1 ते 3 टक्‍क्‍यांची वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) ठेवींमध्ये 3.8 टक्के तर बॅंक ऑफ इंडियामध्ये (बीओआय) 1.5 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. याशिवाय जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बॅंक खात्यांत असलेल्या शून्य रुपयांच्या खात्यांवर अचानक मोठी वाढ होऊ लागली आहे. या सर्व प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली असून सरकारी यंत्रणांची या सर्व व्यवहारांवर बारीक नजर आहे.

Web Title: Rush for deposits in Banks