करूणानिधींच्या अंत्यदर्शनाला गर्दी; दिग्गजांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच चेन्नईत दाखल झाले असून, ते थोड्याच वेळात पार्थिवाचे दर्शन घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ही अंतिम दर्शनासाठी चेन्नईत येतील. नुकतेच राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, अभिनेते रजनीकांत अशा दिग्गज नेत्यांनी राजाजी हॉल येथे करूणानिधींनी श्रद्धांजली अर्पित केली. 

चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी (वय 94) यांचे काल (ता. 7) संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (ता. 8) करूणानिधींच्या अंतिम दर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. कार्यकर्ते, राजकारणी व सामान्य जनतेला येथे अंतिम दर्शन घेता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच चेन्नईत दाखल झाले असून, ते थोड्याच वेळात पार्थिवाचे दर्शन घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ही अंतिम दर्शनासाठी चेन्नईत येतील. नुकतेच राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, अभिनेते रजनीकांत अशा दिग्गज नेत्यांनी राजाजी हॉल येथे करूणानिधींनी श्रद्धांजली अर्पित केली. 

निधनानंतर काल (ता. 7) संध्याकाळी त्यांच्या गोपालपूरम येथील निवासस्थानी आणण्यात आले. तिथून त्यांचे पार्थिव त्यांची मुलगी व डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्या सीआयटी कॉलनीतील निवासस्थानी नेण्यात आले. आज (ता. 8) पहाटे चार वाजता करूणानिधी यांचे पार्थिव चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. राजाजी हॉल येथे करूणानिधींचे समर्थक, कार्यकर्ते यांच्या रांगा लागल्या असून शोकाकूल वातावरणात त्यांना निरोप देण्यात येईल. 

करूणानिधींनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. करूणानिधी हे कला, संगीत, गायन, लेखन असे गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व होते. तमिळनाडूच्या राजकारणात त्यांचा मोलाचा वाटा होता. मरीना बीचवरील जागेत अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. 

दिल्लीसह सर्व राज्यातील राजधानीतील राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे, तसेच देशभरात राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने आज एक दिवसाची सुट्टी दिली आहे. तर तमिळनाडूमध्ये सात दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  

Web Title: rush for the last ritual of M Karunanidhi