esakal | भारत-चीनच्या वादात रशियाचा हस्तक्षेप नाही
sakal

बोलून बातमी शोधा

भारत-चीनच्या वादात रशियाचा हस्तक्षेप नाही

भारत आणि चीन वादामध्ये पडण्यास रशियाने अप्रत्यक्षरीत्या नकार दिला आहे. सर्गेई लावारोव्ह यांनी आज भारत, रशिया आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेमध्ये बोलताना उपरोक्त भूमिका मांडली.

भारत-चीनच्या वादात रशियाचा हस्तक्षेप नाही

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली -  भारत आणि चीन वादामध्ये पडण्यास रशियाने अप्रत्यक्षरीत्या नकार दिला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव्ह यांनी आज भारत, रशिया आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेमध्ये (रिक) बोलताना उपरोक्त भूमिका मांडली. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर या दोन्ही देशांना मदतीची काहीही आवश्‍यकता नसल्याचे लावारोव्ह यांनी नमूद केले. संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला रशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या परिषदेमध्ये बोलताना म्हणाले, ‘‘बड्या देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करून जगासमोर उदाहरण प्रस्थापित करावे. सर्वांच्या हिताचे निर्णय करूनच आपण पुढे गेले पाहिजे. वैश्विक नेतृत्वाचा आवाज सर्वांच्या हितासाठी असणे आवश्यक आहे. ‘रिक’ परिषदेने जगासमोर उदाहरण सादर करावे. सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाण्यानेच प्रगतशील विश्व साकारता येईल. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या पालनातून, सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक, बहुपक्षीयतेला पाठिंबा आणि सर्वांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करूनच आपल्याला चांगली आणि चिरंतन टिकणारी वैश्विक व्यवस्था निर्माण करता येईल. आंतरराष्ट्रीय संबंधांवर असलेल्या आपल्या विश्वासाचे प्रतिबिंब या ‘रिक’ परिषदेतून दिसते. मात्र, परिषदेच्या सिद्धांत आणि नियमांचे पालन योग्य प्रकारे करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.’’

loading image
go to top