"रशिया दौऱ्यातून अपेक्षा नाहीत' 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जुलै 2018

आगामी रशिया दौऱ्यातून आपल्याला फारशा अपेक्षा नाहीत, असे जाहीरपणे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्वत:ला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. बेल्जियम आणि ब्रिटनच्या दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यादरम्यानही ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अथवा कृतीमुळे ते चर्चेत होते. 

हेलसिंकी : आगामी रशिया दौऱ्यातून आपल्याला फारशा अपेक्षा नाहीत, असे जाहीरपणे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्वत:ला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. बेल्जियम आणि ब्रिटनच्या दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यादरम्यानही ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अथवा कृतीमुळे ते चर्चेत होते. 

पुतीन आणि ट्रम्प यांच्यात हेलिसिंकी परिषदेच्या निमित्ताने उद्या (ता. 16) भेट होत असून, या भेटीवर अमेरिकी निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाचा आरोप, ब्रिटनमधील शहरामध्ये रशियाकडून विषारी वायू सोडण्याचा आरोप, आखातातील युद्धामध्ये पश्‍चिमी आघाडीला पाठिंबा देण्याबाबत अमेरिका गंभीर नसल्याचा "नाटो'चा आरोप आणि पुतीन यांचा सीरियातील असाद सरकारला असलेला पाठिंबा या मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याने या भेटीच्या निमित्ताने ते सुधारण्याचा प्रयत्न करू, असे रशिया सरकारचे सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांना ब्रिटनमध्ये निदर्शनांना सामोरे जावे लागले होते, आता फिनलंडची राजधानी हेलसिंकीमध्येही निदर्शने होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून फारशी अपेक्षा नसल्याचे वक्तव्य करत ट्रम्प यांनी निराशावादी सूर लावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in russia tour is not expecting anything says trump