रशिया-युक्रेन : भारतीय विद्यार्थी रशियातून पूर्ण करू शकणार अर्धवट शिक्षण

नवी दिल्लीतील रशियन दूतावासाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine War Sakal

Russia-Ukranine War : गेल्या तीन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, युद्धाची ठिणगी पडल्यानंतर युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांना (India Student In Ukraine) भारतात परतावे लागले होते. यामुळे अनेकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. दरम्यान, अर्धवट शिक्षण सोडून भारतात परतलेले विद्यार्थी (Student) रशियन विद्यापिठातून शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. नवी दिल्लीतील रशियन दूतावासाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना रशियन विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जाणार असून, या ठिकाणी विद्यार्थी त्यांचा संबंधित अभ्यासक्रम सुरू ठेवू शकणार आहे. (Russia Ukraine War News)

Russia Ukraine War
झेलेन्स्की आता थेट आक्रमक पुतिन यांनाच भेटणार; रशिया-युक्रेन शांत होणार?

रशिया युक्रेनमधील युद्धची (Russia Ukraine War) सुरुवात होऊन आता जवळपास तीन महिन्यांहून अधिकचा काळ उलटला आहे. दरम्यान, ज्यावेळी यो दोन्ही देशांमध्ये युद्धाला प्रत्यक्षात सुरुवात झाली त्यावेळी युक्रेनमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतासह अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या निर्णयामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांवर भविष्याची टांगती तलवार आली होती. अनेकांना अर्धवट शिक्षण सोडून मायदेशात परतावे लागले होते. (Russian Am)

दरम्यान, या दोन्ही देशांमधील युद्ध काही केल्या थांबण्याचे ना घेत नसल्याने उर्वरित शिक्षण (Education) कसे पूर्ण करायचे असा प्रश्न लाखो विद्यार्थांसमोर उभा ठाकला होता. मात्र, आता अर्धवट शिक्षण सोडून भारतात परतलेले विद्यार्थी आता रशियन विद्यापीठात प्रवेश करून अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत, असे बाबुश्किन यांनी सांगितले.

Russia Ukraine War
युक्रेन-रशिया युद्धात कोणीही जिंकणार नाही, PM मोदींचं जर्मनीत वक्तव्य

शिष्यवृत्ती घेण्यासदेखील सक्षम असाल

रशियन फेडरेशनचे मानद कॉन्सुल आणि तिरुअनंतपुरममधील रशियन हाऊसचे संचालक रतीश सी. नायर यांच्या मते, ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती त्यांना रशियन विद्यापीठांमध्येही शिष्यवृत्ती मिळू शकते, जरी त्यांनी रशियन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शुल्क स्पष्ट केले आहे. मात्र, युक्रेनमध्ये भरलेली फी येथील विद्यापीठांसाठी वैध असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com