काँग्रेसमध्ये मतभेद; पराभवासाठी पायलटच जबाबदार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जून 2019

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आता राजस्थान काँग्रेसमधील वाद समोर येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. 

जयपूर- लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आता राजस्थान काँग्रेसमधील वाद समोर येत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. 

सचिन पायलट यांनी आपला मुलगा वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी घ्यायला हवी असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गेहलोत बोलत होते. वैभव गेहलोत जोधपूरमधून निवडणूक लढवत होते. जोधपूरच्या जागेसाठी वैभव यांच्या नावाची शिफारस सचिन पायलट यांनी केली होती हे खरे आहे का? असा प्रश्न गेहलोत यांना विचारण्यात आला होता. त्यावर गेहलोत यांनी 'पायलट यांनी माझ्या मुलाचे नाव सुचविले असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे. यावरूनच आमच्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाही हे स्पष्ट होते' असेही म्हटलं आहे.

'वैभव हे मोठ्या फरकाने जिंकतील असे पायलट यांनीच म्हटले होते, याचे कारण म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचे 6 आमदार आहेत. आमचा निवडणूक प्रचारही उत्तम होता. त्यामुळेच सचिन पायलट यांनी वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मला वाटते की ही एक सामूहिक जबाबदारी आहे' असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Pilot should take responsibility for my sons defeat says Ashok Gehlot