...म्हणून सचिन तेंडुलकरने केली 'या' मुलींकडून दाढी

Sachin Tendulkar met barbershop girls and praised them on Instagram
Sachin Tendulkar met barbershop girls and praised them on Instagram

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रथमच बाहेरून दाढी करून घेतली आहे, ती पण दोन मुलींकडून. यामागील कारणही तसेच आहे. सचिनने दाढीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

सचिनने दाढीचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर दाढी करणाऱया नेहा व ज्योती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेहा आणि ज्योती या उत्तर प्रदेशातील बनवारी तोला गावातल्या रहिवासी आहेत. 2014 मध्ये त्यांचे वडील आजारी पडले. न्हावी म्हणून काम करणाऱ्या वडिलांचे हातावरचे पोट. घरातील कर्ता पुरुषच आजारी पडल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली. घरखर्च चालवण्यासाठी नेहा व ज्योतीने वस्तरा हाती धरला व त्या चर्चेत आल्या. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात मुलींनी पाय रोवण्यास सुरुवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, वडिलांच्या आजारपणाचा खर्च उचलण्याचे ध्येय असल्यामुळे दोघींनी मागे वळून पाहिलं नाही.

सचिन तेंडुलकरने दोघींच्या कामाची दखल घेतली. सचिनने प्रथमच त्यांच्याकडून दाढी करून घेतली. शिवाय, सचिनने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन दोघींना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने सोशल मीडियावर छायाचित्र अपलोड केल्यानंतर उत्तर प्रदेशातील 'बार्बरशॉप गर्ल्स' सध्या यूट्यूबवर चर्चेत आल्या आहेत. नेहा आणि ज्योती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com