सचिनने मानले पंतप्रधानांचे आभार

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात'मध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत विद्यार्थ्यांनी कोणाशीही स्पर्धा न करता स्वत: मेहनत करावी, असे आवाहन केले होते. त्याला प्रत्युत्तर देत सचिन तेंडुलकरने पंतप्रधानांचे आभार व्यक्त करून मेहनत ही विद्यार्थ्याला आणि खेळाडूलाही घ्यावी लागते, असे स्पष्ट केले आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांना धन्यवाद दिले आहेत. तयारी ही प्रत्येकालाच करावी लागते, मग तो विद्यार्थी असो की खेळाडू. लक्ष्य हे आपले आव्हान कमी करते, असे तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

आपल्या "मन की बात' या कार्यक्रमात सचिनचा उल्लेख करीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. त्यांच्या या आवाहनाला सचिनने ट्विटच्या माध्यमातून प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सचिनने स्वत:लाच एक आव्हान दिले आहे आणि तो नवीन विक्रम करीत आहे. हेच किती प्रेरणादायी आहे.

Web Title: sachin thanks narendra modi