'केजरीवाल यांचे नवे नाव, अरविंद 'हवाला' केजरीवाल'

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

हवाला रॅकेटमध्ये केजरीवाल यांचा समावेश असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. मिश्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी अरविंद 'हवाला' केजरीवाल असे नाव ठेवले पाहिजे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षातून (आप) हकालपट्टी करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करत, अरविंद केजरीवाल यांचे नवे नाव अरविंद 'हवाला' केजरीवाल असल्याचे म्हटले आहे.

मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. तसेच मिश्रा यांनी आपच्या पाच नेत्यांच्या परदेश दौऱ्यावर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती केजरीवाल यांच्याकडे मागितली होती. केजरीवाल यांनी या प्रकरणी कोणतेही वक्तव्य केले नसून, मिश्रा यांनी उपोषणही केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

हवाला रॅकेटमध्ये केजरीवाल यांचा समावेश असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. मिश्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी अरविंद 'हवाला' केजरीवाल असे नाव ठेवले पाहिजे. मी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन आप नेत्यांच्या रशिया दौऱ्याबाबत नवा खुलासा करणार आहे. आपला मिळालेल्या देणग्या या हवाला रॅकेटमधून मिळाल्या आहेत. 

Web Title: sacked aap minister kapil mishras new name for delhi cm arvind hawala kejriwal