ममता दीदींची दादासाठी प्रार्थना!

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 2 January 2021

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.  

कोलकाता : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तानंतर क्रिकेट प्रेमींसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी धक्का देणारी आहे. ते आजारातून लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

 

 BREAKING : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींना ह्रदयविकाराचा झटका, ICU मध्ये उपचार सुरु

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून गांगुलींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे. गांगुलींच्या कुटुंबियाशी बोलणं झाले आहे. गांगुलींवर योग्य उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशा आशयाचे ट्विट जय शहा यांनी केले आहे.

सौरव गांगुली यांच्यावर उपचारासाठी कोलकाता येथील वूडलँड्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याच आले आहे. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला असून  आयसीयूत उपचार सुरु असल्याचेही समजते. जीममध्ये व्यायाम करत असताना त्यांची तब्येत बिघडल्याचे समजते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sad to hear Ganguly suffered a mild cardiac Says Mamata Banerjee