पाणी योजनांसाठी केंद्राकडे एक हजार कोटींची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

नवी दिल्ली, ता. 14 : महाराष्ट्रातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना आणि नव्या योजनांसाठी केंद्र सरकारने एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. मात्र, केंद्राने राज्याला नऊ हजार पाणी योजनांसाठीचे 500 कोटी रुपयेही अद्याप दिले नाहीत, ते कधी मिळणार याबाबत संभ्रम कायम आहे. 

"राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम व स्वजल योजना' या विषयावर सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेत खोत यांनी ही मागणी केली. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री साध्वी उमा भारती यांनी महाराष्ट्राच्याही मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. 

केंद्राकडून 14 व्या वित्त आयोगाचा निधी राज्यांना थेट येऊ लागल्याने राज्याला राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या निधीत कपात झाल्याचीही बाब खोत यांनी या वेळी निदर्शनास आणून दिली. राज्यातील 150 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. तसेच भौगोलिक रचनेनुसार राज्याचा 92 टक्के भाग हा खडकाळ असल्याचे त्यांनी सांगितले. 

खोत म्हणाले, की राज्याने नव्याने सहा हजार 223 पाणीपुरवठा योजना तयार केल्या असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी जवळपास 12 हजार कोटींचा खर्च येणार आहे. यातील केंद्राचा वाटा 500 कोटींचा आहे. राज्यातील 2015 पासून अपूर्ण असलेल्या योजना व नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने दोन टप्प्यांत राज्याला निधी द्यावा. त्यातील पहिल्या टप्प्यात एक हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी खोत यांनी या वेळी केली. राज्यात 2015 ते 2018 मध्ये सुरू झालेल्या सुमारे नऊ हजार पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडून 500 कोटींचा निधी मिळणे बाकी आहे हेही त्यांनी नमूद केले. 

6,223 नव्याने तयार केलेल्या पाणीपुरवठा योजना 

12 हजार कोटी रुपये 

अंमलबजावणीचा खर्च 

500 कोटी रुपये 
केंद्राचा वाटा 

Web Title: sadabhau khot demanded Rs 1,000 crore for water schemes