'उद्या मी भगवी साडी नेसली तर, हे मलाही साध्वी स्वरा म्हणतील'

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

दहशतवादाचा कोणताही धर्म नसला तरी दहशतवाद्यांचा असतो. त्यामुळे साध्वी ठाकूर यांच्यावर दहशतवादाचे आरोप असतील तर त्या हिंदू दहशतवादी आरोपी आहेत, असा आरोपही स्वराने केला.

भोपाळ : रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आज येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. मला ढोंगी लोकांची भीती वाटत नाही, उद्या मी भगवी साडी नेसली तर हे लोक मलाही साध्वी स्वरा भास्कर म्हणतील, असे स्वरा म्हणाली. 

स्वरा हिने आज येथे कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांचा प्रचार केला. "खुनाचा आरोप असलेल्यांना आपण घरात घेत नाहीत, त्यांच्याशी संबंध जोडत नाहीत, मग दहशतवादाचा आरोप असलेल्यांच्या हातात देशाची सूत्रे कशी द्यायची? ठाकूर यांच्यावर फक्त आरोप असल्याचे "बिरबल की संतान' असलेले भाजपवाले म्हणतात. यांना दहशतवादाचा आरोप साधा वाटतो का?,' अशी प्रश्‍नांची फैरीच स्वरा हिने विचारली.

दहशतवादाचा कोणताही धर्म नसला तरी दहशतवाद्यांचा असतो. त्यामुळे साध्वी ठाकूर यांच्यावर दहशतवादाचे आरोप असतील तर त्या हिंदू दहशतवादी आरोपी आहेत, असा आरोपही स्वराने केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadhvi Pragya a mix of politics and crime says Swara Bhaskar hits out at BJP