तुरुंगातील छळास हुतात्मा करकरे जबाबदार - साध्वी प्रज्ञासिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

चिदंबरम यांचाही उल्लेख 
भगवा दहशतवाद शब्द प्रयोगासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांनी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना जबाबदार धरले. जे लोक निधर्मी असतात, त्यांच्यासाठी भगवा वाईटच आहे. भगवा आतंकवाद हे कॉंग्रेसचे एक षड्‌यंत्र होते. हे मात्र, निश्‍चित आहे. हे सिद्ध करण्यासाठी सर्व गोष्ट रचण्यात आली. एनआयए जिथल्या तिथेच आहे. कोणतीही संस्था ही सरळमार्गी असते. ती तपास करते आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल. ते तुमच्या समोर आहेत. असेही प्रज्ञासिंह म्हणाल्या. 

नई दिल्ली - मालेगाव बॉंबस्फोटप्रकरणी जामिनावर सुटलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी तुरुंगात असताना आपला शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. अशाप्रकारे छळास सामोरी जाणारी मी एकमेव महिला असेल, असे प्रज्ञासिंह यांनी स्पष्ट करतानाच मुंबई हल्ल्यात हुतात्मा झालेले एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. 

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "आपल्याला बेकायदा अटक करून सुरतवरून मुंबईला आणले गेले. कॅन्सरग्रस्त असतानाही आपली प्रकृती त्या वेळी पूर्णपणे ठीक होती. मात्र, आज आपली जी अवस्था आहे, त्यास एटीएस जबाबदार आहे. अटकेत असताना आपला मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक छळ झाला. असा छळ देश पारतंत्र्यात असतानाही कोणत्या महिलेच्या वाट्याला आला नसेल. मात्र, तरीही आपण मनाने कणखर राहिलो.'' 

मागील नऊ वर्षांत हुतात्मा झालेल्या जवानांना प्रज्ञासिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तत्कालीन कॉंग्रेस सरकारने रचलेल्या षड्‌यंत्राची शिक्षा मी आतापर्यंत भोगत आहे. आता हा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू राहील. त्यामुळे मानसिकरीत्या त्याचे बंधन माझ्या मनावर असेल, असे प्रज्ञासिंह यांनी स्पष्ट करत जामीन मंजूर केल्याबद्दल न्यायालयाचे आभारही मानले. 

चिदंबरम यांचाही उल्लेख 
भगवा दहशतवाद शब्द प्रयोगासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांनी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना जबाबदार धरले. जे लोक निधर्मी असतात, त्यांच्यासाठी भगवा वाईटच आहे. भगवा आतंकवाद हे कॉंग्रेसचे एक षड्‌यंत्र होते. हे मात्र, निश्‍चित आहे. हे सिद्ध करण्यासाठी सर्व गोष्ट रचण्यात आली. एनआयए जिथल्या तिथेच आहे. कोणतीही संस्था ही सरळमार्गी असते. ती तपास करते आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल. ते तुमच्या समोर आहेत. असेही प्रज्ञासिंह म्हणाल्या. 

Web Title: Sadhvi Pragya speaks after coming out of jail, claims Hemant Karkare, Thane police commissioner tortured her