
लोकसभा खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे.
माझी हत्या होऊ शकते, सुरक्षा द्या; ओवैसींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
नवी दिल्ली - लोकसभा खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. माझी हत्या होऊ शकते, माझ्या जीवाला धोका आहे असं सांगत त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. ओम बिर्ला यांनी पत्रात लिहिलं आहे की, त्यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानाची तोडफोड झाली त्यानंतर सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षा पुरवण्यात यावी. तसंच निवासस्थानी झालेल्या तोडफोडीची चौकशी खासदारांच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात यावी.
मंगळवारी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या २४ अशोक रोड, नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी आंदोलन केलं होतं. त्यानंतर तोडफोडीची घटना घडली होती. आंदोलकांनी ओवैसींच्या निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेली नेम प्लेट, लाइट आणि खिडकीच्या काचा फोडल्या. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ओवैसी घरात नव्हते. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा: शिवसेना आमदारांची छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात धाव
ओवैसींनी लिहिलेल्या पत्रात असा आऱोप केला आहे की, त्यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यासाठी पोहोचलेल्या व्यक्तींकडे धारदार शस्त्रे होते. त्यांच्याजवळ कुऱ्हाड, काठी वैगेर होते. यावेळी दगडफेकही करण्यात आली. तसंच घराला लावलेली नेम प्लेटही तोडली. पोलिसांनी या प्रकरणी फक्त ५ जणांना अटक केली असून हल्ला झाला तेव्हा १३ जण होते असेही ओवैसी म्हणाले.
Web Title: Saduddin Owaisi Letter To Lok Sabha Speaker Om Birla Asked For Security And Investigation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..