भगवा रुमाल अडकवला म्हणजे हल्ला करणार काय : अखिलेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

अखिलेश यांनी अलाहाबाद येथे बीएसपी नेत्याच्या हत्येवरूनही योगी सरकारवर टीका केली आहे. यादव यांनी समाजवादी पक्षाच्या सरकारच्या योजना विद्यमान सरकारकडून बंद केल्या जात असल्याच्या निर्णयाबाबतही नाराजी व्यक्त केली.

लखनौ - गळ्यात भगवा रंगाचा रुमाल अडकवला म्हणजे पोलिस ठाण्यात घुसण्याची परवानगी मिळते की काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आदित्यनाथ सरकारला केला आहे. योगी आदित्यनाथ सरकारवर कायदा आणि सुव्यवस्थेवरून यादव यांनी प्रश्‍नांचा भडिमार केला आहे.

अखिलेश यादव यांनी यूपीत अलीकडच्या काळात झालेल्या घटनेसंदर्भात आदित्यनाथ सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. अखिलेश यांनी म्हटले, की स्वातंत्र्यानंतरही पोलिसांना अशा प्रकारची वागणूक दिली गेली नव्हती ती आता दिली जात आहे. गळ्यात भगवा रंगाचा गमचा घालणाऱ्यांना पोलिसांना मारहाण करण्याचा परवाना कोणी दिला, असा प्रश्नही केला.

अखिलेश यांनी अलाहाबाद येथे बीएसपी नेत्याच्या हत्येवरूनही योगी सरकारवर टीका केली आहे. यादव यांनी समाजवादी पक्षाच्या सरकारच्या योजना विद्यमान सरकारकडून बंद केल्या जात असल्याच्या निर्णयाबाबतही नाराजी व्यक्त केली. ज्या महिलांची पेन्शन सध्याच्या सरकारने बंद केली आहे, त्यांना आमच्यासोबत घेऊ, असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.

Web Title: Saffron clad men have got licence to beat cops in UP under Yogi Adityanath: Akhilesh Yadav