भगवा दहशतवाद खराच : स्वरा भास्कर

Saffron Terror is Real says Actress Swara Bhaskar
Saffron Terror is Real says Actress Swara Bhaskar

नवी दिल्ली : ''पोलिस ठाणे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. त्यामुळे या लोकांनाही फाशीची शिक्षा होणार का?'' असा सवाल अभिनेत्री स्वरा भास्करने केला. तसेच 'भगवा दहशतवाद हा खरा आहे', असे म्हणत तिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून केरळमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याने याचा विरोध दर्शविण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून, नेडुमांगडू पोलिस ठाण्यावर चार गावठी बॉम्ब फेकण्यात आले. या पोलिस ठाण्यावर बॉम्ब फेकणारे आरएसएसशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. त्यावरून स्वरा भास्करने सोशल मीडियावरून आरएसएसवर टीकास्त्र सोडले.

स्वरा म्हणाली, ''पोलिस ठाणे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. त्यामुळे या लोकांनाही फाशीची शिक्षा होणार का? भगवा दहशतवाद हाच खरा आहे''.

दरम्यान, शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर दोन महिलांनी या मंदिरात प्रवेश केला होता. त्यांच्या या मंदिरप्रवेशानंतर येथील काही लोकांकडून कडाडून विरोध करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com