परवानगी नाकरल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरच्या दौऱ्यावर

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

सहारनपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सहारनपूरचा दौरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकरली आहे. मात्र तरीही रस्त्याने प्रवास करत गांधी सहारनपूरच्या दिशेने निघाले आहेत.

लखनौ (उत्तर प्रदेश) : सहारनपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सहारनपूरचा दौरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकरली आहे. मात्र तरीही रस्त्याने प्रवास करत गांधी सहारनपूरच्या दिशेने निघाले आहेत.

जातीयवादातून गेल्या काही दिवसात जातीयवादातून सहारनपूरमध्ये हिंसाचार झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तेथे तणावाची परिस्थिती आहे. त्यामध्ये आतापर्यंत दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांनी सहारनपूरच्या दौऱ्याची परवानगी मागितली होती. मात्र सहारनपूरमधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत तेथे नेत्यांना बंदी असल्याचे राज्याचे धोरण असल्याचे सांगत त्यांना परवानगी नाकारण्यात आली. मात्र, तरीही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी यांनी हा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रमुख राज बब्बर आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझादही आहेत. गांधी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची अनुमती नाकारल्याने ते रस्त्याने प्रवास करत आहेत.

"ते देशातील गरीब, दलित आणि आदिवासींचा आवाज दाबून टाकू शकत नाहीत. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष बोलत राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी केलेल्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या पीडितांना भेटण्यासाठी राहुल गांधी यांना कोणीही रोखू शकत नाही', अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सरकारवर भाजपवर टीका केली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परवानगी नाकारल्यानंतर सहारनपूरला जाणाऱ्या राहुल गांधी यांनी अटक होण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्याः

Web Title: saharanpur news rahul gandhi congress bjp yogi adityanath saharanpur violence