स्टडी ऍब्रॉड ऑनलाइन समिटचे आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

परदेशातील शिक्षणाच्या विविध संधी, तेथील प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करणारे हे ऑनलाइन समिट आहे. यामध्ये परदेशातील विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे.

पुणे : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. 20) पासून मंगळवार (ता. 23) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर "स्टडी ऍब्रॉड'द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून, फेसबुक लाइव्हद्वारे प्रश्‍नही विचारता येणार आहेत. 

परदेशातील शिक्षणाच्या विविध संधी, तेथील प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करणारे हे ऑनलाइन समिट आहे. यामध्ये परदेशातील विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म पोर्टलवर आहे. रजिस्ट्रेशन केलेल्यांना व्हिडिओ अपलोड झाले की मेल येतील. फेसबुक ग्रुपमध्ये इन्व्हाइट केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार ते बघता येतील. 

काय माहिती मिळणार? 
परदेशातील स्कॉलरशिप कुठल्या आहेत. अमेरिका, युरोप, रशिया, आशिया इथे कुठली विद्यापीठे आहेत. जाण्यासाठी किती खर्च येतो? तिथे जाण्यासाठी काही स्कॉलरशिप आहेत का? याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. 

स्टडी ऍब्रॉड ऑनलाइन समिट 
कधी : शनिवार (ता. 20) ते मंगळवार (ता. 23) 
रजिस्ट्रेशन ः विनामूल्य 
रजिस्ट्रेशन ः www.vidyasakal.com 
ग्रुप : https://www.facebook.com/groups/SakalVidya 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vidya Online Sumit